Uncategorized
Trending

दौंडमध्ये निवडणुकीचा माहोल : भावी नगरसेवकांचा अचानक ‘जनसंपर्क’ वाढला!

दौंड शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भावी नगरसेवक उदयास येऊ लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत शहरातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या वा सामाजिक उपक्रमांमध्ये फारसे योगदान न देणारे हेच लोक आता मतदारसंघात सक्रीय झालेले दिसत आहेत.निवडणुकीचा वारा लागल्याने रस्त्यांवर, कार्यक्रमांत आणि गल्लीबोळांत हे “भावी जनप्रतिनिधी” दिसू लागले आहेत. मात्र नागरिकांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, “पाच वर्षे आम्हाला विचारले नाही, आता मतांचा हंगाम आल्यावरच का भेट देतात?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.स्थानिकांच्या मते, समाजहिताचे काम सतत करणारे लोकच खरे जनसेवक असतात — फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय होणारे नव्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button